अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील बोरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा काही दिवस विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने डंपरच्या सहाय्याने एकमेकांच्या संपर्कात राहून रात्रभर वाळू उपसा करून वाहतूक सुरू असल्याच्या प्रकार घडत आहे. आता या वाळू माफियांना रोखण्यासाठी प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र किंबहुना दिसत आहे, कारण गावकऱ्यांना दिसत असलेले वाळू वाहतूक मात्र महसूल प्रशासनाच्या नजरेत का बरं येत नसावे, हा एक संशोधनाच्या भाग असावा.
काही कलेक्शन एजंटच्या मदतीने वाळू माफिया जोरदार वाळू उपसा करून वाहतूक करीत असल्याचे दबक्या आवाजात सर्वसामान्यांमधून सुर उमटताना दिसत आहे, तर प्रशासनाने योग्य भूमिका घेऊन कार्यवाही करावी, नाहीतर येणाऱ्या काळात अनेक गावकरी यासंदर्भात मोठी भूमिका घेणार असल्याचे समजते.
काही दिवसापूर्वी अवैध वाळू माफिया विरोधात जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्रकार समाधान मैराळे यांनी दिलेले तक्रारीवर जिल्हा पथक लवकरच अमळनेर येथे दौरा करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
फापोरे - मंगरूळ रस्तालगत अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा ढीग जमा असल्याबाबत बातमी खान्देश समाचारने काही दिवसापूर्वी प्रसारित केली होती, तसेच या ठिकाणी जाऊन तहसीलदार यांच्या आदेशाने मंडल अधिकारी यांनी पंचनामाही केला होता, मात्र ही वाळू चोरीला गेली कशी किंवा या घटनेत कोणत्या अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर केला तर नसावा ? यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे कळते.खान्देश समाचार..
संपादक - प्रविण बैसाणे...
