अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील आठवडे बाजार परिसरात अनेक किराणा दुकानांच्या बाहेर साठवून ठेवलेले मिठाच्या गोण्या चोरांकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस ही मालमत्ता चोरी होत असून, मागील चार-पाच दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे, अशी माहिती स्थानिक व्यापाऱ्यांकडून मिळाली आहे.
विशेष म्हणजे, या चोरीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून देखील अद्याप कोणत्याही व्यापाऱ्याने अधिकृतपणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. परिणामी चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
या प्रकारामुळे आठवडे बाजारातील किराणा दुकानदारांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक प्रशासन व पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेणे आवश्यक आहे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली जात आहे.
खान्देश समाचारने संपर्क साधला असता, काही व्यापाऱ्यांनी सांगितले की:
"आम्ही रात्री दुकान बंद केल्यानंतर माल बाहेर ठेवतो, परंतु मागील काही रात्रींमध्ये गोण्या गायब होत आहेत. आम्ही सीसीटीव्ही चेक केला असता, काही तरुण चोरी करताना दिसले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी."
