अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर शहरातील सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या बजरंगलाल अग्रवाल कुटुंबातील यशवी राधेश्याम अग्रवाल हिने सी.ए. (चार्टर्ड अकौंटंट) ही अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करत कौतुकास पात्र ठरली आहे.
विशेष म्हणजे, यशवी ही या कुटुंबातील सहावी सी.ए. ठरली असून हा परिवार ‘सी.ए. परिवार’ म्हणून सर्वत्र चर्चेत आहे. यशवीचे वडील राधेश्याम अग्रवाल, काका नीरज अग्रवाल, काकू सौ. ममता अग्रवाल, मोठी बहीण आणि जिजाजी हे सर्वजण आधीच सी.ए. झाले आहेत. यामुळे संपूर्ण कुटुंबातच अभ्यास, चिकाटी आणि व्यावसायिक प्राविण्याचे वातावरण आहे.
यशवीने सततचा अभ्यास, कष्ट, आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हे यश प्राप्त केल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शिक्षक, मित्रपरिवार आणि समाजातूनही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उद्योजक बजरंगलाल अग्रवाल यांची ही नात असल्याने, या यशामुळे अग्रवाल कुटुंबाचा सन्मान अधिकच उंचावला आहे.
खान्देश समाचार... ✍️
मुख्य संपादक प्रवीण बैसाणे
