अमळनेर प्रतिनिधी |
“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या तत्त्वाला आत्मसात करत, अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे आमदार तथा माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील हे आज तालुक्याच्या जनतेच्या विश्वासाचे, विकासाचे आणि नेतृत्वाचे खरे प्रतीक ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत असून, कार्यकर्त्यांत आणि जनतेमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमळनेर शहरासह ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यकर्त्यांनी विशेष कार्यक्रम घेतले, तसेच नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील उत्साहात पार पडले.
अनिलदादांच्या कार्यकाळात अमळनेरच्या विकासाला नवे गतीमान लाभले आहे.
रस्ते विकास
जलसंपदा प्रकल्प
शिक्षण व आरोग्य सुविधा
कृषी आणि सिंचन क्षेत्रातील सुधारणा
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची वाढ
या सर्व बाबतीत त्यांनी अमळनेर तालुक्याला सक्षम दिशा दिली. विशेषतः पाडळसरे धरणाच्या उच्चस्तरीय मंजुरीमुळे तालुक्यातील शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा झपाट्याने उभ्या राहत आहेत.
जनतेशी थेट संपर्क, लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया आणि प्रत्येक कामामागचा अभ्यासू दृष्टिकोन यामुळे दादांची ओळख एक सज्जन, लोकसंग्राही आणि दूरदृष्टी असलेला नेता अशी झाली आहे.
या यशोयात्रेमध्ये त्यांच्या पत्नी – माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील यांचा देखील मोठा वाटा आहे. त्या देखील विविध सामाजिक कार्यांद्वारे शहराच्या व तालुक्याच्या प्रगतीत मोलाचा सहभाग देत आहेत.
"अमळनेर बदलतोय" हे केवळ घोषवाक्य न राहता आज ते वास्तवात उतरले आहे. आणि त्या परिवर्तनाचे शिल्पकार – अनिलदादा पाटील – यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!"
(जाहिरात)
