अमळनेर (प्रतिनिधी) – इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतलेल्या भूमिकेबाबत तसेच बीएचएमएस (BHMS) डॉक्टरांच्या हक्कांची बाजू मांडण्यासाठी अमळनेर तालुका होमिओपॅथी असोसिएशनने मा. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले.
सदर निवेदनात सांगण्यात आले की, राज्य सरकारने जानेवारी २०१४ रोजी होमिओपॅथिक डॉक्टरांना ग्रामीण भागात एलोपॅथी औषधोपचारासाठी परवानगी दिली आहे. या अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील सुमारे ३०० डॉक्टर एकत्र येत हक्काच्या मागणीसाठी एकवटले आहेत.
सीसीएच नोंदणीबाबत शासनाच्या विलंबाला विरोध
२४ जून २०१४ रोजी विधानमंडळात बहुमताने मंजूर झालेले विधेयक व त्यानंतर राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार, होमिओपॅथी डॉक्टरांना MMC नोंदणीद्वारे एलोपॅथीची मर्यादित परवानगी देण्यात आली होती. परंतु, २०१६ मध्ये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) याला स्थगिती दिली.
त्यानंतर, शासनाने पुन्हा एकदा MMC नोंदणी सुरु करण्यास मान्यता दिली असली तरी प्रत्यक्ष आदेश अद्याप मिळालेले नाहीत. यामुळे डॉक्टरांमध्ये असंतोष आहे.
असोसिएशनने प्रशासनाला निवेदनात स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, १६ जुलै २०२५ पर्यंत MMC नोंदणीबाबत ठोस निर्णय न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
तसेच, मुंबई येथे आरोग्य संचालनालयावर मोर्चा काढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
निवेदन देताना उपस्थित डॉ. डी. एम. पाटील,
डॉ. देवयानी बडगुजर,डॉ. मिलिंद पाटील,
डॉ. परेश पाटील,डॉ. योगेश नेतकर,डॉ. जितेंद्र पाटील,डॉ.स्नेहल पाटील,डॉ.अजय बिऱ्हाडे,
डॉ. राजेश वाखरे,डॉ. नम्रता जाधव,डॉ. दिनेश पाटील,डॉ.मिलिंद पाटील,डॉ. विजय ठाकरे,डॉ.परेशपाटील,डॉ.प्राजक्ता पाटील
डॉ. मंजुषा जैन,डॉ. दीपाली साळुंखे,डॉ. प्रिया मानेगावकर इत्यादी डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
