अमळनेर तालुका (प्रतिनिधी)
अमळनेर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हेडावे ते पळासदळे, कुऱ्हे खु , बु नगाव खु, बु धुपी, पिळोदा गांधली मेहरगाव या मार्गावर सुरू असलेल्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामावर गंभीर स्वरूपाचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत कामात दर्जाहीनतेची ठळक उदाहरणे दिसत असून रस्त्याच्या कडेला खडीचे संस्तर नाही, पाण्याचा योग्य वापर झालेला नाही आणि बेसची तयारी अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे.
कामासाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची टाकण्यात येत असूनही प्रत्यक्षात अपूर्ण व निकृष्ट कामामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप जागरूक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सदर कामाची चौकशी संबंधित विभागामार्फत करण्यासाठी तक्रार दाखल होणार आहे.
नागरिक व शेतकऱ्यांना या रस्त्याचा उपयोग करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून,सुरू असलेल्या पावसाळ्यात या मार्गावर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कामाकडे संबंधित प्रशासनाने लक्ष दिले गेले पाहिजे आणि ठेकेदाराचे योग्य काम न केल्यामुळे सदर रस्ता कॉलिटी कंट्रोल विभागाकडे लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
“सरकारने निधी दिला, पण काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर तो निधी वाया जाणार. तातडीने योग्य काम झाले नाही, तर शासनाचे व नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
खान्देश समाचार, अमळनेर
