अमळनेर(प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे तरुण सुलेमान खान यांच्यावर झालेल्या मॉब लिंचिंग घटनेविरोधात अमळनेर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या निवेदनातून या अमानुष घटनेमुळे केवळ एका तरुणाचा जीव गमावावा लागला नसून, समाजातील सलोखा, बंधुता व संविधानिक मूल्यांवरही गहिरी जखम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी
घटनेतील मास्टरमाइंडला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी
पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीची तरतूद करण्यात यावी
धार्मिक उन्माद पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे
या निवेदनप्रसंगी नसीर हाजी, फिरोज मिस्री, मौलाना रियाज़ शेख, शेखा हाजी, गुलाम नबी, शेख नविद, इमरान शेख कादर, सैय्यद अजहर अली, ॲड. शकील काजी, अहमद सैयद, जमालोद्दीन, जुबेर पठान, मुशीर शेख, जावेद खान, काशीफ अली, अलीमोद्दीन शेख, शाहरुख बागवान यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा घटनांवर कडक कारवाई होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा समाजाने व्यक्त केली आहे.
खान्देश समाचार...