अमळनेर:(प्रतिनिधी)आगामी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत नगराध्यक्ष पदासाठी एका लोकप्रिय आणि सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या नावाचा प्रवेश झाला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून उमेदवारीसाठी संजय पारधी उर्फ संजय मच्छीवाला हे सज्ज झाले असून, त्यांना समाजातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांची उमेदवारी अमळनेरच्या राजकीय पटलावर निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
संजय पारधी हे केवळ एक उमेदवार नसून, ते गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर शहरातील जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे एक सुप्रसिद्ध व प्रचलित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक कार्यात त्यांचा अग्रज सहभाग असतो, ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष पदाचे दावेदार मानले जात आहेत. अमळनेर शहरातील खराब झालेल्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी संजय पारधी यांना निवडून देण्याची भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे.
'विकासाचा वारसा' घेऊन मैदानात!👇
संजय पारधी यांच्या कामाची झलक त्यांच्या पत्नी आणि वार्ड क्रमांक ३ च्या माजी नगरसेविका राधाबाई पवार यांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांमधून दिसते. या कार्यकाळात त्यांनी वॉर्डात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. विशेषतः मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे, गांधलीपुरा भागात तरुणांसाठी व्यायाम शाळा साहित्य उपलब्ध करून देणे, समाज मंदिरांसाठी बांधकाम करण्याचे प्रयत्न करून मोठी निधी मंजूर करून घेतली, परिसरातील तरुणांसाठी सहकाऱ्यांच्या मदतीने लायब्ररी सुरू केली आहे तसेच रस्ते, गटारी आणि इतर नागरी सुविधांची कामे त्यांनी पूर्ण केली आहेत. समाजाच्या हितासाठी नेहमी उभे राहिले.
आदिवासी समाजाचे नेतृत्व, सर्वधर्मीयांचा पाठिंबा!👇
संजय पारधी हे खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी उभे राहिले आहेत. मात्र, त्यांची कार्यशैली केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून, त्यांनी प्रत्येक समाजामध्ये चांगले संबंध जपले आहेत. त्यामुळे त्यांना केवळ आदिवासी समाजाकडूनच नव्हे, तर सर्वधर्मीय नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. सगळ्यांच्या हितासाठी आणि अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
निवडणुकीच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर संजय पारधी यांची उमेदवारी अमळनेरला एक सक्षम, लोकप्रिय आणि जन-सामान्यांशी जोडलेले नेतृत्व मिळवून देईल, अशी आशा व्यक्त होत आहे. अमळनेरकरांनी आता त्यांच्या सामाजिक कार्याचा व नेतृत्वाचा सन्मान करून त्यांना नगराध्यक्षपदी निवडून द्यावे, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
खान्देश समाचार...
