अमळनेर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि जळगाव जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहरात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, अमळनेर शहर उपाध्यक्षपदी महेश राजेंद्र सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) यांच्या हस्ते महेश सुतार यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मराठी अस्मितेचा मुद्दा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या मनसेचा जळगाव जिल्ह्यात विस्तार होत आहे. या नियुक्तीद्वारे अमळनेर शहरात पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आणि नवनवीन युवकांना पक्षाशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी महेश सुतार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
"अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांना मनसेच्या विचारधारेशी जोडून, पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन."
-महेश सुतार, नवनियुक्त शहर उपाध्यक्ष.
सध्या अमळनेर तालुक्यात मोठ्या संख्येने युवक मनसेत प्रवेश करत आहेत. या वाढत्या प्रतिसादामुळेच सक्रिय कार्यकर्त्यांना पदे देऊन जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. महेश सुतार यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खान्देश समाचार..
