जळगाव:-(प्रतिनिधी)जिल्हा माथाडी कामगार कार्यालय येथे सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
त्यावेळी महाराष्ट्र स्टेट सेकयुरीटी गार्ड अँन्ड जनरल वर्कर्स युनियन,मुंबई अध्यक्ष सोमा कढरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मुख्य अभियंता निवास तापि महामंडळ येथिल सुरक्षा रक्षक यांना कमी करुन मेस्को सुरक्षा रक्षक एजंसी चे गार्ड कोणतीही निविदा प्रक्रिया न काढता बेकायदेशीर पणे नियुक्त करण्यात आले आहेत.सदर आस्थापना सुरक्षा रक्षक मंडळ येथे नोंदीत असुन त्या ठिकाणी कोणतीही एजन्सी अथवा इतर बाह्य यंत्रणा कडुन सुरक्षा रक्षक ठेवता येते नाही, मात्र वाघुर उप अभियंता यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून स्वतः चे हीत साध्य करण्यासाठी मेस्को एजंसी कडुन संबंधित अभियंता यांस दर महिन्याला आर्थिक लाभ ही होत आहे ? त्या साठी संघटना संबंधित अभियंता यांचेवर २५ (२)४२_(१) नुसार तातडीने कारवाई करण्यात यावी,तो पर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, अशी घोषणा कामगार युनियन अध्यक्ष सोमा कढरे यांनी केली आहे. जोपर्यंत नोंदीत सुरक्षा रक्षकांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असे प्रसार माध्यमांशी बोलताना अध्यक्ष सोमा कढरे यांनी कळवले आहे,तसेच माथाडी निरीक्षक सी.पी.पाटील यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे,त्यावेळी गौतम पारवे, पुनमचंद निकम, सुरसिंग पाटील इत्यादी कामगार नेते उपस्थित होते.

खान्देश समाचार..✍️