भवरखेडे (धरणगाव प्रतिनिधी):
सामाजिक वनीकरण विभाग,धरणगाव जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील माध्यमिक विद्यालय भवरखेडे - विवरे येथे नुकताच 'सेवा पंधरवाडा' कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनल पाटील मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पर्यावरणाचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाची गरज यावर त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वन विभाग जळगाव येथील मान्यवर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यात वनक्षेत्रपाल श्रीयुत एन. एन. शीरसागर सर, वनपाल श्री. एल. आर. सोनार सर आणि वनरक्षक श्री. वाय. पी. पाटील यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत, विद्यालयाच्या वतीने त्यांचे शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीयुत राजकिशोर बाबुलाल पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती, ज्यामुळे विद्यार्थी आणि उपस्थितांना त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळाला.
वृक्षारोपण आणि सत्कार समारंभावेळी शाळेतील शिक्षक समाधान पाटील, राजेश ठाकरे, स्वप्निल पवार,पंकज ठाकरे,सविता पाटील,अनिता पाटील,सुनिता लोहार व शिक्षकेतर कर्मचारी अजय बाविस्कर शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यास मदत झाली, तसेच सेवा पंधरवड्याचा उद्देश सफल झाला.
खान्देश अमळनेर..
